मे २०२६ प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

 मे २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे 

1.

निबोंळी पावडर

2.

निबोंळी पावडर

3.

Metarisum and beveria bassiana 2 kg each per acre 

Or bayer Lasenta 150 gm / acre 200 litre water

4.

प्रकाश सापळे लावत आहे 

5.

* Epn

* Pacilomycine

* Lecnta + decis

* Slayer pro

6.

लिंबाच्या झाडाखाली प्रकाश सापळे लाउन

7.  शरद केशवराव बोंडे (भिलोना तालुका अचलपूर  जिल्हा अमरावती)

खरीप पिकांना (विशेषतः सोयाबीन, कपाशी) हुमणी (White Grub) अळीपासून वाचवण्यासाठी सध्या खालील प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत:१. जैविक नियंत्रण (सर्वात प्रभावी):मेटारायझियम ॲनिसोप्ली (Metarhizium anisopliae): हे जैविक कीटकनाशक प्रति एकर २ ते ३ किलो शेणखतात किंवा ओल्या मातीत मिसळून जमिनीत द्यावे.ब्युव्हेरिया बॅसियाना (Beauveria bassiana): याचा वापरही हुमणीच्या अळ्या नष्ट करण्यासाठी केला जातो.निंबोळी पेंड: पेरणीपूर्वी हेक्टरी ५०० किलो निंबोळी पेंड जमिनीत टाकल्यास हुमणीच्या अंड्यांचा नायनाट होतो.२. यांत्रिक नियंत्रण:प्रकाश सापळे (Light Traps): जून-जुलैमध्ये मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. रात्रीच्या वेळी शेताच्या बांधावर प्रकाश सापळे लावून या भुंगऱ्यांना आकर्षित करून नष्ट केले जाते.लिंबाच्या झाडांची छाटणी: भुंगेरे रात्रीच्या वेळी लिंब, बाभूळ किंवा बोर अशा झाडांच्या पानांवर बसतात. पहाटेच्या वेळी ही झाडे हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत.३. रासायनिक नियंत्रण:क्लोरपायरीफॉस (Chlorpyriphos): हेक्टरी ४ ते ५ लिटर क्लोरपायरीफॉस ठिबक सिंचनातून किंवा वाफसा अवस्थेत जमिनीत द्यावे.बियाणे प्रक्रिया: पेरणीपूर्वी बियाण्याला क्लोरपायरीफॉस किंवा इमिडाक्लोप्रिडची प्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या काळात अळीपासून संरक्षण मिळते.४. मशागतीय उपाय:उन्हाळी नांगरट: जमिनीची खोल नांगरट केल्यामुळे हुमणीच्या अळ्या, कोश उन्हात वर येतात आणि पक्षी त्यांना खातात किंवा कडक उन्हामुळे त्या मरतात.टीप: हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाच्या मुळांशी ओलावा असतानाच वरील उपाययोजना करणे अधिक फायदेशीर ठरते.

8.

खरीप पिकांना हुमणीपासून वाचवण्यासाठी आम्ही शेतामध्ये प्रकाश सापळ्याचा उपयोग करतो. रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होणारे भुंगे या सापळ्यात अडकतात, त्यामुळे त्यांची संख्या कमी होण्यास मदत होते व पुढील हुमणीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो. तसेच हुमणी नियंत्रणासाठी जैविक उपाय म्हणून मेटारायझियम ॲनिसोप्ली हे जैविक बुरशीयुक्त घटक जमिनीतून देण्यात येते. त्यामुळे हुमणीचे नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण होण्यास मदत होते. याशिवाय शेत स्वच्छ ठेवणे, वेळेवर नांगरणी करणे आणि सेंद्रिय खतांचा वापर करणे यावरही आम्ही भर देतो. यामुळे पिकांचे संरक्षण होऊन उत्पादन चांगले मिळण्यास मदत होते.

9.

 जमीन ओली असतांना metaryzam अनोसोपली जमिनीतून दिल्यास हुमणीचा कॅनट्रोल होऊ शकतो

10.

पहिला पाऊस पडायच्या अगोदर लिंबाचे झाड किंवा इतर झाडे यांच्या खाली एक खड्डा खणून त्यामध्ये प्लास्टिक पेपर अंधारून त्यामध्ये पाणी टाकून कीटक नाशक किंवा तेल मिसळून खड्डाच्या वरती बल्ब लावून प्रकाश केल्यास भूगेरे प्रकाशामुळे येतील व त्या पाण्यात पडल्यावर मरतील.त्यामूळे हूमिनिचे प्रमाण नगण्य राहतील

11.

प्रकाश सापळे लावले आहेत खड्डा खणून त्यामध्ये प्लास्टिक पेपर अंधारून पाणी सोडण्यात येऊन कीटक नाशक औषधे टाकून लिंबाचे झाड आहे त्यावरती बंल्ब टांगला आहे प्रकाश मुळे भूगेरे आकर्षित होतात आणि त्या पाण्यात पडतात मरतात त्यामुळे हूमिनिचे प्रमाण कमी होते 

12.

Bhuastra super cha vapar karto amhi

13.

लेसेंटा कीटक नाशक वापरले आहे 150 ग्राम /400 लिटर पाणी..

14.

प्रकाश सापळे एरंडे बिया सापळे metaryzam epn culture  खरीप पिकासाठी खोल सकाळ आणि संध्याकाळी नांगराट  हुमणी भोंगे वेचुन मारणे क्लोरो 50 टक्के lesenta डेंटसू इतकं आल्यावण्या हुनुमाना ला ज्या झाडाचा पानाचा हार घतो त्या पानाचा अर्क काढून alavani इतकं आपण उपाय करु शकता 

15.

एकात्मिक कीड नियत्रण अत्यावशक आहे 

16.

लेसेंटा वापरतो 

17.अशोक कचरू दिवटे, पिंपळनेर

निंबोळी युक्त खताची पेरणी करावी.

18.राणी अशोक दिवटे, पिंपळनेर

हुमणी पासून बचाव करण्यासाठी शेतामध्ये नांगरट चालू असताना झिंगे (सुकटी) फेकावे..

19.बाबुराव लांडगे, निंबर्गी 

Lesenta

20.गणपत रावसाहेब मिसाळ (जानेफळ तालुका भोकरदन जिल्हा जालना)

खरीपात हुमणी नियंत्रणासाठी मी हे करतो:

*मे महिन्यात खोल नांगरणी* करून अळ्या उन्हात मारतो.

*कुजलेले शेणखत* वापरतो, कच्चे नाही.

*प्रकाश सापळे* पहिल्या पावसानंतर लावून भुंगेरे पकडतो.

*मेटारायझियम/बिव्हेरिया* 2 किलो/एकर शेणखतातून जमिनीत देतो.

*बीजप्रक्रिया* क्लोरपायरीफॉस ने करतो.

या IPM पद्धतीमुळे हुमणीचा त्रास 80% कमी झाला आहे.

21.विशाल पाटील, सोलापूर

बेसल डोस मध्ये फिप्रोनील gr 5 केजी कीटकनाशक मिक्स करून डोस करणे किंवा ज्या पिकाला ड्रिप आहे त्या पिकामध्ये हलमा 1 ली प्रति एकर ड्रिप मधून सोडणे 

22.छगन बाळकृष्ण वैरागडे (मु,पो,आकोट ता,पवनी जिल्हा,भंडारा)

Metaryzum anasopli

23.भाऊसाहेब गीते, नेवासा 

खरीप पिकांना हुमणीपासून वाचवण्यासाठी मी खालील उपाययोजना करत आहे :

* उन्हाळ्यात खोल नांगरट करून हुमणीच्या अळ्या व अंडी नष्ट करतो.

* पावसापूर्वी शेत स्वच्छ ठेवून तणांचे नियंत्रण करतो.

* प्रकाश सापळ्यांचा वापर करून भुंगे पकडतो.

* शेणखतामध्ये जैविक बुरशीनाशक व जिवाणू खत मिसळून वापरतो.

* नीम पेंड आणि जैविक उपायांचा वापर करून जमिनीतील किडींचे प्रमाण कमी करतो.

* गरजेनुसार कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधांचा वापर करतो.

* पीक फेरपालट केल्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

या उपायांमुळे हुमणीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होत असून पिकांची वाढ निरोगी राहते.

24.आप्पासाहेब पुंडलिक यादव, जांभळी शिरोळ कोल्हापूर

आम्ही लेसेंटा कीटकनाशक वापरतो. 150 ग्राम /400लिटर पाणी.

25.मगदूम संजयकुमार ईश्वरा (लिंगपूर ता मिरज जि सांगली)

*1) नांगरणे . शेत जमीन खोल नांगरट 2) कुजलेले चांगले शेण खत वापर 3) प्रकाश योजना 4) रासायनिक . पावडर पाऊसासाच्या सुरुवातीस प्रकाश योजना इ.

26.

मी बुवेरिया basiana मुळा वाटे देतो

27.शरद केशवराव बोंडे (भिलोना तालुका अचलपूर  जिल्हा अमरावती)

*खरीप पिकांना हुमणी (White Grub) अळीपासून वाचवण्यासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापनाचा (IPM) वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने जून-जुलै महिन्यात प्रकाश सापळे लावून प्रौढ भुंगेरे नष्ट करणे, मेटारायझियम ॲनिसोप्लिया या जैविक बुरशीचा जमिनीत वापर करणे आणि शेताची खोल नांगरट करून अळ्या पक्ष्यांना खाऊ घालणे या उपाययोजना केल्या जातात。हुमणी नियंत्रणासाठी शेतकरी प्रामुख्याने खालील तीन टप्प्यांत उपाययोजना करतात:

* प्रौढ भुंगेरे नियंत्रण (पावसाळ्यानंतर लगेच)प्रकाश सापळे (Light Traps): वळवाचा किंवा खरीपाचा पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. संध्याकाळी ७ ते १० या वेळेत शेताच्या बांधावर प्रकाश सापळे किंवा एका खड्ड्यात रॉकेलचे पाणी ठेवून भुंगेऱ्यांचा नाश केला जातो。झाडांचे भुंगेरे नष्ट करणे: कडुनिंब, बाभूळ, बोर अशा झाडांवर हे भुंगेरे रात्रीच्या वेळी अंडी घालण्यासाठी व खाण्यासाठी जमा होतात. सकाळी हे भुंगेरे झाडावरून खाली पाडून नष्ट केले जातात。

*जैविक नियंत्रण (सेंद्रिय उपाय)जैविक कीटकनाशके: हुमणीच्या नियंत्रणासाठी 'मेटारायझियम ॲनिसोप्लिया' (Metarhizium) किंवा 'बिव्हेरिया बासियाना' (Beauveria bassiana) या जैविक बुरशीचा वापर केला जातो. ही बुरशी शेणखतात किंवा वाळूमध्ये मिसळून जमिनीत दिल्यास अळ्या नष्ट होतात。निम केक (निंबोळी पेंड): पेरणीच्या वेळी जमिनीत निंबोळी पेंड वापरल्याने हुमणीचा प्रादुर्भाव कमी होतो.

* रासायनिक आणि इतर उपायखोल नांगरट: उन्हाळ्यात किंवा आंतरमशागतीच्या वेळी शेतीची खोल नांगरट केल्यास जमिनीतील हुमणीच्या अळ्या आणि कोष वर येतात व पक्षी त्यांना खाऊन टाकतात。रासायनिक औषधे: प्रादुर्भाव जास्त असल्यास पिकांच्या मुळाशी शिफारशीनुसार कीटकनाशकांची आळवणी (Drenching) केली जाते。 याबद्दल अधिक माहितीसाठी आणि योग्य मात्रेचा डोस जाणून घेण्यासाठी आपल्या जवळील कृषी विज्ञान केंद्राशी (KVK) किंवा ग्रीन रेवोल्युशन IPM Schoo त्यांच्याशी संपर्क साधावा येथील तज्ञ मंडळी आपल्याला योग्य माहिती देतील. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

28.सागर आसवले (रा दौलत वाडी ता. कागल कोल्हापूर)

प्रकाश साफळे लावत आहे 

29.संतोष कृष्णात जाधव (कसबा आरळे ता.करवीर  जि.कोल्हापूर)

मेटारायझिम पावडर देशी गायीचे गोमूत्र तसेच प्रकाश सापळे लावून व पिकाची फेरपालट त्यात भात रोप लागण करतो.

30.वैभव अशोक खर्चे (शेगाव बाजार ता.मोताळा  जि.बुलढाणा)

सर्वप्रथम पावसाळ्याच्या सुरुवातीला लाईट ट्रॅप लावून हुमणी अळ्यांचे भुंगे नियंत्रनात आणणे व पावसाळ्यात नियंत्रण मे टारझियाम अनिसपोसोली या जैविक बुरशीनाशकांची drenching किंवा मातीत मिसळून शेतात फेकून देणें.

31.संगीता राजेंद्र जगताप (गाडीमोडी ता.दौंड  जि.पुणे)

आम्ही खरीप हंगामामध्ये उसाचे पीक घेतो बेसल डोस मध्ये फर्टेरा मिक्स करतो आणि ऊस उगवणे नंतर वसंत दादा इन्स्टिट्यूट चे बिहरिया हे जिवाणू एकरी दोन लिटर सोडतो.

32.अभिजितसिंह शहाजीराव पाटील (खडकेवाडा बेलुंकी ता.कागल, जि.कोल्हापूर)

* खोल नांगरट 2.रात्रीचे सापळे लावणे, 3) जमिनीत मेटारायझम बिव्हेरीया बुरशी सोडणे.4.बाभळीच्या वव कडुलिंबाच्या  झाडावर औषध फवारणी करणे

33.ज्ञानेश्वर बापूराव आदबाने (चिंचोली ता.भोकरदन जि. जालना)

पहिली पावसाळी नांगरणी करा – खोल नांगरणीमुळे जमिनीतल्या अळ्या/कोष वर येतात व पक्षी त्यांना खातात.

शेत स्वच्छ ठेवा – तण व जुने अवशेष कमी ठेवल्यास प्रादुर्भाव कमी होतो.

रात्री प्रकाश सापळे (light trap) लावा – भुंगे आकर्षित होऊन कमी होण्यास मदत होते.

बियाणे/माती प्रक्रिया – कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्राच्या सल्ल्याने योग्य कीडनाशक/जैविक उपाय वापरा; पीक आणि प्रादुर्भावानुसार औषध बदलते. काही मातीतील कीटक नियंत्रणासाठी दाणेदार कीटकनाशके वापरली जातात, पण मात्रा पिकानुसार बदलते. 

शेणखत चांगले कुजलेले वापरा – अपूर्ण कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांमुळे काहीवेळा किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

34.

Grub guard /  EPN

35.             (भिलवडी ता. पलूस जि.सांगली)

EPN

36.जगदंबे ओंकार शिवाजी ((कारेगाव ता.धर्माबाद, जि.नांदेड)

खरीप हंगामासाठी सर्वप्रथम जे हुमणीचा प्रादुर्भाव असतो उघड्या  उकिरड्या/उखंडा मोठ्या प्रमाणात जाणवतो त्यासाठी आम्ही beaveria beseania/metarhizium anisolpile तसेच ट्रायकोडर्मा चा वापर 2% 200 लिटरचा ड्रम मध्ये उकिरडा भरत असताना टाकत असतो. वाळवाचा पाऊस झाला असता नीम व बाभळीच्या झाडावर जे विकनाशकाचे फवारणी व खड्डा खोदून प्रकाश सापळ्याचा वापर करतो.

37.चंद्रशेखर उमदेव उंबरकर (ढोरपा पहारणी, ता.नागभीर, जि.नागपुर)

Bhuastra supar

38.आकाश रवींद्र विधळे (जवळा शहापूर तां चादुर बाजार जिल्हा अमरावती)

हे बघा हुमणी अळी साठी खुप उपाय योजना आहेत पण आपण जर खरीप हगाम सुरू व्हायचा आधी शेताची मशागत चागली केली तर त्या तशाच नश्ट होतात शेताची नागरी वगरे केली तर त्या बाहेर निघतात उनी मुळे तशाच मरता दुसऱ्या उपाय

जमीन पुर्ण थडी झाल्यावर पेरणी पुर्वी आपण शेतात शेन खता बरोबर ट्रायकोडर्मा मिसळून थड जागेत ठेवावे नतर ते पुर्ण शेतात फेकून द्यावे नाही काही रासायनिक पण उपाय आहे बियाणे ला बिज प्रकरीया करणे पिक उगवुन आलावर Drenching करु शकतो 

हे दोन प्रभावी जैविक अस्त्रे आहेत - 1) Metarhizium 2) Beauveria हे वापरायचे कशे ड्रिप द्वारे किंवा आळवणी करावी  आणि शेण खतात मिसळून देवु शकता  फक्त हे वापरायचा आधी जमीन ओली असने गरजेचे आहे मी माझ उत्तर माडल

39.

Metarizhium anisoplae 

40.राहुल घनवट (पिंपराड, ता.फलटण, जि.सातारा)

मेटारायझिम ऍनिसोपली  + बिव्हेरिया बासियाना (BVM) किंवा Epn

41.योगेश तुपके (तळेगाव माले, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर)

*लाईट ट्रॅप वापरणे - त्यामुळे हुमणी अळीचे भुंगे हे लाईट ट्रॅप कडे आकर्षिले जातात आणि हुमणी अळीची एक महत्त्वाची स्टेप कमी झाल्यामुळे हुमणी अळीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते.

*सूत्र कृमी द्वारे नियंत्रण: (Entomopathogenic nematodes (EPNs)) - सूत्र कृमींचा संसर्ग हा हुमणी अळीवर होऊन हुमणी अळी 24 ते 48 घंट्यामध्ये मरण पावते. 

* शेतीमध्ये 'मेटारिझियम ॲनिसोप्लिया' (Metarhizium anisopliae) ही एक अतिशय उपयुक्त जैविक कीटकनाशक बुरशी आहे. ही बुरशी हुमणीच्या संपर्कात आल्यामुळे तिच्यावरील बीजाणू हुमणीच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे काही दिवसांतच हुमणी मृत पावते. 

*उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोलगट नांगरट करावी त्यामुळे हुमणीचे भुंगे हे वातावरणात उघड पडतात आणि त्यामुळे ते हुमणीचे भुंगे वेचून केरोसीन मध्ये टाकावे किंवा डिझेलमध्ये टाकावे जेणेकरून ती मरण पावतील. नांगरट संध्याकाळी करू नये नांगरटी एक तर सकाळी करावी किंवा दुपारी करावी जेणेकरून शेतकऱ्याचा जो मित्र आहे बगळा हा पक्षी ते हुमणीचे भुंगे वेचून खातो. 

*एकात्मिक व्यवस्थापन: पहिला पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगे हे जमिनीतून वर येतात आणि लिंबाच्या आणि बाभळीचा कोवळा पाला ते खातात अशा वेळेस संध्याकाळी पहिला पाऊस झाल्यानंतर तिथं लाईट ट्रॅप लावायचा झाडाखाली किंवा त्या झाडावरती रासायनिक कीटकनाशक फवारायचे जेणेकरून ते कीटकनाशक पानावर पडेल आणि ते कोवळे पानही भुंगे खातील आणि मग ते मरण पावतील.रोगग्रस्त वनस्पतीवर हुमणीच्या अळीने हल्ला केल्यास तर ते रोगग्रस्त वनस्पतीचे झाड उपटून टाकायचे आणि त्या खालील हुमणी वेचून घेऊन ती केरोसीन मध्ये टाकायची.

* हेक्‍टरी 30 किलो कार्बोफ्युरॉन या कीटकनाशकाचे दाणे हे जमिनीत टाकावे जेणेकरून हुमणी अळीवरती नियंत्रण मिळवता येईल पण यामध्ये जास्त प्रमाण या कीटकनाशकाचे  जमिनीत टाकू नये कारण त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव मरण पावतात.

* हुमणी अळीचा प्रादुर्भाव जर खूपच जास्त असेल पिकामध्ये तर पिकाला पाणी देताना फिप्रोनील (४०%) कीटकनाशक पाण्यामध्ये स्त्रवित करावे जेणेकरून हुमणी आळी वरती नियंत्रण मिळवता येईल .

42.कैलास पाटील (खटाव, ता.वडूज, जि.सातारा)

Endomopathagenic Nematode base product 

"EPN Power"

which is ICAR  Sugarcane Breeding Institute Coimbatore inovative product. 

It's best results. 

43.अमर भास्कर वाटेगावकर  (बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली )

ट्रॅप लावले आहेत

44. बाबासो रामचंद्र सातवेकर (अर्जुनवाडा ता. कागल जि कोल्हापूर)

शेताची खोल नांगरट करून अळ्या वेचणे, पहिला पाऊस झाल्यावर रात्रीच्या वेळी बाभूळ-कडुनिंबावरील भुंगेरे गोळा करून नष्ट करणे आणि जमिनीत जैविक बुरशी किंवा निंबोळी पेंड मिसळणे

45.ओंकार लक्ष्मण पाटील (मोहोळ, ता.मोहोळ, जि.सोलापूर)

बांधावर लिंब,बाबळी ची झाडे  ठेवत  नाही  पहिल्या  पावसानंतर  त्याचा संख्या  मध्ये  वाढ  होते त्यासाठी  metarizium anisopile ही जैविक बुरशी चा वापर  करतो. 

46.श्रीकांत हिंदुराव पाटील (रा अर्जुनवाडा पोस्ट करड्याळ ता. कागल जि.कोल्हापूर)

बल अडकून सापळी चे जाळे करू

47.श्रीकृष्ण लक्ष्मण माळी (मुक्काम पोस्ट पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली)

शेणखतात मेटारीझम मिक्स करून शेतात टाकतो प्रादुर्भाव वाटल्यास आळवणी करतो

48.श्री  गंगाधर दतराम पा. मुकदमे (बितनाळ ता. उमरी जि. नांदेड)

रात्रीला लाईट सापळे किंवा प्रकाश सापळे या दोन्हीही प्रकारचे उपाय करावेत 

49.शुभम बारवकर (ढोकराई, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर)

शेण खतामुळे जास्त हुमणी चा प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळे ते टाकणे टाळतोय बेसल डोस मध्ये दाणेदार carbofuran 3% CG 3 kg प्रति एकर टाकतोय अन लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी क्लोरो 50% आळवणी करणार

50.अनिल लुगडे (अर्जुनवाडा, ता.कागल, जि.कोल्हापूर)

नाही केली

51.

Biological product use

52.सचिन महाजन (हिवरखेडे बु, ता.जामनेर, जि.जळगाव)

खरीप पिकांचे हुमणीपासून संरक्षण करण्यासाठी मुख्यत्वे प्रकाश सापळे (लाइट ट्रॅप) लावणे, शेतातील बाभूळ व कडुनिंबाची झाडे रात्री हलवून भुंगेरे गोळा करून नष्ट करणे आणि जमिनीत 'मेटारायझियम ॲनिसोप्ली' (Metarhizium anisopliae) या जैविक बुरशीचा वापर करतो.

53. अमोल आनंदा खोत (ओझर्डे ता. वाळवा जि. सांगली)

मेटारायझन व बिबेरिया ही जैविके वापरतो

54.विद्या शिंदे (मालेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली)

मे महिन्याच्या सुरवातीला  मी घरी बनवलेले निंबोळी अर्क जमिनीत पाण्यातून सोडते वर्षातून एकदाच हा प्रयोग केल्यावर हुमणी होतच नाही पाच वर्ष झाली हा प्रयोग मी करत आहे. देशी गाईस गोमूत्र  कडू वनस्पतीचा अर्क हिंग यापासून हे जालीम औषध तयार होते. हे कीटकनाशक सर्व पिकावर फावरून मी चांगले रिझल्ट  घेतलेले आहेत, शिवाय जिथं झाडे आहेततिथे  हुमणी प्रकाश सापळा लावते. 🙏सेंद्रिय शेती, शाश्वत शेती. उत्तम शेती सेंद्रिय शेती.

55.अजित पाटील (टोप जिल्हा कोल्हापूर)

शेतात हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करणे, शेणखतात 'मेटारायझियम ॲनिसोप्लिए' मिसळणे आणि वळवाच्या पावसानंतर झाडांवरील भुंगेरे नष्ट करणे आवश्यक आहे. हुमणी होऊ नये म्हणून खालील उपाययोजना कराव्यात

*मशागतीय उपाय :उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. यामुळे जमिनीतील हुमणीच्या अळ्या आणि कोष उन्हात उघडे पडतात व पक्षी त्यांना खाऊन टाकतात.शेतात पूर्ण कुजलेले शेणखत वापरावे. कच्च्या शेणखतामुळे हुमणीचे भुंगेरे आकर्षित होतात.

*भुंगेरे नियंत्रण (पावसाळ्याच्या सुरुवातीला):वळवाचा किंवा पहिला पाऊस पडल्यानंतर लगेच संध्याकाळी (७ ते ९ च्या दरम्यान) बाभूळ, कडुनिंब किंवा बोर यांसारख्या झाडांवर हुमणीचे भुंगेरे जमा होतात.हे भुंगेरे झाडांच्या फांद्या हलवून खाली पाडावेत आणि रॉकेलच्या किंवा डिझेलच्या पाण्यात टाकून नष्ट करावेत.शेतात 'प्रकाश सापळे' (Light Traps) लावून भुंगेऱ्यांना आकर्षित करून मारावे

*जैविक नियंत्रण (पिकाच्या वाढीच्या काळात):हुमणीची अळी नष्ट करण्यासाठी 'मेटारायझियम ॲनिसोप्लिए' (Metarhizium anisopliae) किंवा 'बिव्हेरिया बासियाना' या जैविक कीटकनाशकाचा वापर करावा. हेक्टरी १० किलो जैविक खत शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे.

*रासायनिक उपाय:प्रादुर्भाव जास्त असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने पेरणीपूर्वी किंवा आळवणी करताना क्लोरोपायरीफॉस किंवा इमिडाक्लोप्रीड या कीटकनाशकांचा वापर करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest

भात रोपलागणी । कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी। Paddy Farming