टोमॅटो मधील फळकूज समस्या | Fruiting problem in tomato
*टोमॅटो मधील फळकूज समस्या* टोमॅटो पिक घेताना शेतकऱ्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वांत महत्वाचे म्हणजे पिकावर येणारे कीड आणि रोगाचे व्यवस्थापन वेळीच करणे गरजेचे आहे. त्यामुळे नुकसान कमी होऊन चांगले उत्पन्न मिळेल. शिवाय उत्पन्न खर्चही कमी येईल. टोमॅटो पिकामध्ये फळे लागायला सुरुवात झाल्यानंतर उद्भवणारी समस्या म्हणजे फळकूज. पिकामध्ये या रोगामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. आज आपण टोमॅटो पिकामध्ये फळकूज होण्याची कारणे आणि त्यावर काय उपाय करता येतील हे पाहूया. *रोगाचा प्रादुर्भाव:-* टोमॅटो पिकामध्ये फळकूज समस्या प्रामुख्याने पावसाळ्यात दिसून येते. हवामानामध्ये तसेच जमिनीमध्ये जास्त आर्दता रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत असते. या रोगाला बक आय रॉट म्हंटले जाते. रोगाचा फळावर प्रादुर्भाव झाल्यावर फळावर तपकिरी रंगाचे, पाण्याने भिजल्यासारखे गुळगुळीत डाग दिसून येतात आणि फळ सडायला सुरुवात होते. फळ साधारणपणे अर्ध्यापर्यंत सडताना दिसून येते. नियंत्रण:- रोगाचे नियंत्रण हे करण्यासाठी स...