केळीमधील खोड पोखरणारी किड (स्यूडोस्टेम बोअरर). | Odoiporus longicollis
केळीच्या खोडावर असे हे खोड पोखरणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावामुळे अशी छिद्रे दिसत आहेत. केळीमधील खोड पोखरणारी किड (स्यूडोस्टेम बोअरर) वैज्ञानिक नाव :- Odoiporus longicollis नुकसान:- केळी पिकामध्ये हे भुंगे फुलांच्या अवस्थेत आणि घड निर्मितीच्या अवस्थेत झाडावर हल्ला करतात आणि घडांचा वृद्धी थांबवून उत्पादनावर गंभीर परिणाम करतात. किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीला अश्या पद्धतीची लक्षणे पिकामध्ये दिसून येतात. केळीच्या खोडावर जेलीसारखा स्त्राव दिसून येतो ज्यामुळे या किडीचा पिकावर प्रादुर्भाव झाला आहे हे लक्षात येते. खोडाच्या आतमधून अळीने खाल्ल्यामुळे, खोड पोकळ बनते आणि जोराने वारा आल्यास झाडाचा वरील भाग मोडून पडतो. खोडात लांब बोगदे बनवून अळी अधिक नुकसान करते. परिणामी, पाने पिवळी पडतात आणि कोमेजतात, पानांच्या आवरणातून रस सुटतो, देठ कुजतात आणि फळे अकाली पिकतात. किडीचे जीवनचक्र:- या किडीचा भुंगा मजबूत आणि लालसर तपकिरी आणि काळा रंगाचा असतो. हे भुंगे कापलेल्या देठावर फिकट पांढरी अंडी घालतात. अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळीचे डोके गडद तपकिरी रंगाचे क्रीमसारखे पांढरे असते. 20-25 दिवसा...