घाटेअळीचे जैविक पद्धतीने नियंत्रण | Biological control of caterpillars\ Helicovorpa armigera
घाटेअळीचे जैविक पद्धतीने नियंत्रण हरभरा हे जगभरात घेतले महत्वाचे द्विदल पीक.घाटेअळी(Helicovorpa armigera) ही हरभऱ्यामधील मुख्य कीड. ज्याचे नियंत्रण वेळीच नाही केले गेले तर नुकसान अटळ असते. घाटेअळी ही हरभऱ्या व्यतिरीक्त तूर,सोयाबीन, टोमॅटो, मिरची,कापूस, मक्का,भेंडी अश्या अनेक पिकावर उपजीविका करू शकते. या किडीकडे उपजीविकेसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणून ही कीड वर्षभर सक्रिय असते. तसेच आजूबाजूच्या वातावरणामध्ये टिकून राहण्याची क्षमता, किटकनाशकांप्रति प्रतिरोध विकसित करण्याची क्षमता असल्याने कीटकनाशकांचा अतिरिक्त वापरावर मर्यादा येतात. कीड नियंत्रण होत नाहीच पण पिकामध्ये कीटकनाशकांचा अंश उतरतो. म्हणून या किडीच्या जैविक नियंत्रणावर आपण भर दिला पाहिजे. फक्त कीटकनाशकांवर अवलंबून न राहता एकात्मिक दृष्टीकोण ठेवून उपाययोजना कराव्या. घाटेअळीचे जैविक नियंत्रण:- कामगंध सापळे,पक्षिथांबे या यांत्रिक पद्धतीसोबत सुरवातीस निम तेल किंवा निंबोळी अर्काची फवारणी करणे महत्वाचे व फायद्येचे ठरते. अँडीपुंज तसेच लहान अळ्यांचे प्रभावी व्यवस्थापन होते. Baccilus thuringiensis(B.T) हा जिवाणू घाटेअळीसाठ...