निंबोळी पेंड/खताचे फायदे । सेंद्रिय खत । Benefits of Neem Fertilizer
सध्या चालू असलेला भरमसाठ रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकांचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम जाणून बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागले आहेत. सेंद्रिय शेती करताना सेंद्रिय गोष्टींचा वापर अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये शेणखत, गांडूळ खत, निंबोळी खत, कंपोस्ट खत यासोबत निमतेल, दशपर्णी अर्क, वेगवेगळे जैविक खतांचा, औषधांचा उपयोग सेंद्रिय खेती करताना अतिशय महत्वाचा ठरू शकतो. सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी खत/निंबोळी पासून तयार केलेल्या खताचा औषधांचा उपयोग अतिशय महत्वाचा ठरतो. कडूलिंबाचा लिंबोळ्या या पासून निंबोळी पेंड तयार केली जाते. ऑरगॅनिक स्वरूपाचे खत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी या खताला आहे तसेच सेंद्रिय शेती साठी अत्यंत आवश्यक अशी ही निंबोळी पेंड आहे. निंबोळी पेंड ही फळबागायतदार कांदा उत्पादक शेतकरी आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाला खूप आवश्यक आहे. निंबोळी पेंडचा शेतात वापर:- निंबोळी पेंड शेणखत तसेच इतर सेंद्रिय खतांसोबत वापरण्यास अतिशय सुलभ आहे. रासायनिक खतांच्या बेसल डोसमध्ये देखील वापरता येते. निंबोळी पेंड मुळांच्या कार्यक्षेत्रात व्यवस्थ...