कपाशी पिकावर येणाऱ्या बोंडअळ्यांचे प्रकार | Types of bollworms on cotton crop
कापूस पिकावर मुख्यत्वे 16 प्रकारच्या किडी आढळून येतात.त्यापैकी 3 प्रकार हे बोंडअळीचेच आहेत. तर कोणकोणत्या प्रकारच्या बोंडअळ्या कापसावर येतात त्या ओळखाव्या कश्या आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याचा आढावा घेऊयात. ● *घाटेअळी/कॉटन बॉल वर्म(Helicovorpa armigera)* कापसातील हिरवी बोंडअळी म्हणजेच हरभऱ्यातील घाटेअळी आणि तूर तसेच सोयाबिनातील शेंगा पोखरणारी अळी होय. लागवडीनंतर 75 ते 110 दिवसापर्यंत दिसून येतात. * जीवनचक्र: -* ही कीड पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या अवस्थेतून आपले जीवनचक्र पूर्ण करते.एक मादी पतंग एका वेळी 250 ते 300 अंडी देते यातील अळी अवस्था पिकास नुकसान करते.एक ते दीड महिन्यात जीवनचक्र पूर्ण होते आणि एका वर्षात 10 ते 12 पिढ्या जन्माला येत येतात आणि कापूस सोडून बाकीच्या पिकावर सुद्धा उपजीविका करत असल्याने या किडीवर नियंत्रण मिळवणे खुप कठीण होतेय. इतर पिके :- सोयाबीन,तूर,भेंडी,मिरची,तंबाखू,भुईमूग,टोमॅटो,मक्का, ज्वारी आणि इतर 80 पिके * ओळखावे कसे ?* ●किडीचा पतंग दुधी पांढऱ्या व थोडा राखाडी रंगाचा असतो. ●अळी पूर्ण हिरवी असते,कधीकधी वातावरणाती...