शेवगा | Pest of Drumstick | कीड |
कोरडवाहू आणि हलक्या जमिनीमध्ये येणारे चांगले पीक म्हणजे शेवगा. शेवगा हे कमी पाणी क्षेत्रामध्ये तग धरून राहते आणि चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते. सध्या पावसाची स्थिती चांगली आहे, पण बऱ्याचवेळा पाऊस कमी होत असतो. यामुळे अशा परिस्थितीत तग धरुन राहणारे पीक म्हणजे शेवगा. पण या पीकावरही रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो. शेवगा पिकामध्ये येणारी कीड फुलकिडे:- या किडीची पिले आणि प्रौढ कोवळी पाने आणि शेंगांचा पृष्ठभाग खरवडतात आणि त्यातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर आणि शेंगांवर चट्टे पडतात. शेंगांचा आकार वेडावाकडा होतो. फुलकिडे खरवडलेल्या भागावर बुरशींचा शिरकाव होऊन बुरशीजन्य रोग वाढतात. तसेच शेंगांची प्रत खराब होते. नियंत्रण:- लागवडीच्या वेळी जमिनीमध्ये निंबोळी पेंडीचा वापर करावा. शेतामध्ये प्रति एकरी २० निळे चिकट सापळे लावावेत. फुलकिडे दिसू लागल्याबरोबर करंज तेल १ मि.ली. प्रति लीटर याप्रमाणे फवारावे. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असल्यास रासायनिक फवारणी करावी त्यामध्ये डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी १२ ग्रॅम, फिप्रोनील ५ एससी ३० मिली किंवा अॅसिफेट ७...