सप्टेंबर २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

 


सप्टेंबर २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे...

1.

सेंद्रिय खतांचा वापर शेणखत आणि कंपोस्ट: जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी दरवर्षी चांगल्या प्रतीचे शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.गांडूळ खत: हे खत मातीमध्ये टाकल्याने माती भुसभुशीत होते आणि पिकांना पोषक घटक मिळतात.हिरवळीची खते: मुख्य पीक घेण्यापूर्वी ताग किंवा धैंचा यांसारखी पिके शेतात वाढवून ती मातीत गाडावीत. यामुळे मातीत नत्राचे प्रमाण वाढते. पीक फेरपालट (Crop Rotation)एकच पीक वारंवार शेतात घेऊ नये.द्विदल पिकांची लागवड: मुख्य पिकांनंतर किंवा सोबत मूग, उडीद, हरभरा, किंवा भुईमूग यांसारखी द्विदल (डाळवर्गीय) पिके घ्यावीत. ही पिके हवेतील नत्र मातीत शोषून घेतात. रासायनिक खतांचा संतुलित वापरमाती परी‌क्षण 3/4  वर्षांनी तुमच्या शेतातील मातीची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्या.आवश्यकतेनुसार खते: माती परीक्षणाच्या अहवालानुसार (Soil Health Card) जमिनीला ज्या घटकांची गरज आहे, तेवढीच रासायनिक खते द्या. खतांचा अवाजवी वापर टाळा योग्य पाणी व्यवस्थापनठिबक आणि तुषार सिंचन: पिकांना गरजेनुसार पाणी देण्यासाठी ठिबक (Drip) किंवा तुषार (Sprinkler) सिंचनाचा वापर करा.अतिपाणी टाळणे: शेतात जास्त वेळ पाणी साचून राहू देऊ नका. यामुळे जमीन क्षारपड (चोपण) बनते. जमिनीचा निचरा चांगला ठेवा.मातीची धूप थांबवणेबांधबंदिस्ती: पावसाच्या पाण्याने शेतातील सुपीक माती वाहून जाऊ नये म्हणून शेताला मजबूत बांध घालावेत.झाडे लावणे: शेताच्या बांधावर किंवा उताराच्या दिशेने गवत आणि झाडे लावावीत, जेणेकरून माती पकडून राहते.जीवाणू खतांचा वापर (Bio-fertilizers)अझोटोबॅक्टर आणि रायझोबियम: बियाणांना किंवा मातीत जीवाणू खते मिसळल्याने मातीची जैविक क्षमता वाढते आणि पिकांची मुळे अन्नद्रव्ये सहज शोषून घेतात.

2.

मातीची सुपीकता टिकवून उत्पादकता वाढवण्यासाठी मी माझ्या शेतात सेंद्रिय व संतुलित शेती पद्धतीला प्राधान्य देतो. घरातील गायींचे शेण व उपलब्ध सेंद्रिय पदार्थांचा शेतीमध्ये वापर करतो. पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न करतो.

खतांचा वापर शक्यतो माती परीक्षण व पिकांच्या गरजेनुसार करण्यावर भर देतो. रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळून सेंद्रिय खते, जैविक निविष्ठा आणि आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा समतोल वापर करण्याचा प्रयत्न करतो. पाण्याची बचत व कार्यक्षम वापरासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करतो.

कीड व्यवस्थापनात नियमित शेत निरीक्षण करून गरजेनुसार दशपर्णी अर्कासारख्या वनस्पतीजन्य उपायांचा वापर करण्यास प्राधान्य देतो तसेच शेतातील मित्र कीटकांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करतो.

माझ्या मते, माती ही केवळ उत्पादनाचे माध्यम नसून पुढील पिढ्यांसाठी जपायची नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब, जैविक सक्रियता, पोषणतत्त्वांचा समतोल आणि पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे, हीच दीर्घकाळ चांगली उत्पादकता मिळवण्याची गुरुकिल्ली आहे.

3.

गांडूळखत व गो क्रुपा आमरूत वापरतो

4.

ताग,धैचा सारखी हिरवलीची पिके घेतो.

शेणखताचा वापर करतो.

नत्र स्थिर करणारे जिवाणू ,स्फुरद विरघलविणारे जिवाणू, पालाश  ऊपलब्ध करणारे जिवाणू यांचा वापर शेतात मोठ्या प्रमाणात करतो.

पिकांची दरवर्षी फेरपालट करतो.

5.

मी चांगलीच कुजलेले शेणखत मातीमध्ये चांगले मिक्स करून खोल नांगरट करतो त्याच्यामुळे गांडुळांची निर्मिती होते व माती भुसभुशीत होण्यास मदत होते

6.

शेत जमीन सुपीकता टिकून ठेवूने जास्तीत जास्त शेणखत टाकने शक्यतोपर्यंत शेतात कचरा कुजवून त्याचमुळे गांडूळ तयार होतात आणि शेतजमीन सुपीकता वाढते सरकारी खते कमी टाकने कचरा कोणता पण असो शेतातला केळीचा असो किंवा गव्हाचा किंवा गव्हाचे गोळी असो शेतातच कुजविने तरच जमिनीची सुपीकता वाढते स्लरी तयार करणे आणि ती पिकाला वापरणे लिंबाच्या झाडाखाली निंबोळ्या जमा करणे आणि तिची खत तयार करून पिकाला वापरणे आशाने जमिनीची सुपीकता वाढते

7.

सेंद्रिय खत वापराने, हिरवळीचा पिकेघेणे,शेण खत वापरणे 

8.

हिरवाळीची खते शेण खत शेंद्रीय खत 

9.

मातीची सुपीकता टिकून उत्पादकता वाढावी यासाठी मी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत एकरी चार ट

ट्रेलर टाकतो तसेच पहिल्या पिकाचे अवशेष संपूर्ण जमिनीमध्ये गाडले जातात तसेच जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी पिकांना जीवामृताची व त्यामध्ये एनपीके जिवाणू मिसळून त्याची पिकांना आळवणी दिली जाते तसेच तो नियंत्रणासाठी औषधांचा कमीत कमी तीव्रतेचा वापर करून ते नियंत्रण केले जाते. ठिबक द्वारे पाण्यावर नियंत्रण ठेवून जमिनीमध्ये हवा खेळती राहते व त्यामुळे जमिनीची धूप कमी होऊन जमिनीची सुपीकता टिकून राहते.

10.

शेणखताचा व कंपोस्ट खताचा वापर केला पाहिजे.

हिरवाळीची खते- ताग धईंचा या पिकांची पेरणी करून ते मातीत गाडून कुजवले पाहिजे.

पीक फेरपालट केली पाहिजे.,

गांडूळ खते वापरली पाहिजे, 

रसानिक खतांचाही संतुलित वापर केला पाहिजे, 

मतिपारीक्षण केल पाहिजे. त्यानुसार नियोजन केल पाहिजे.

11.

सेंद्रिय खतांचा भरपूर वापर: शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत (Vermicompost) आणि बायोचारचा (Biochar) नियमित

 हिरवळीची खतेदरवर्षी एकाच प्रकारचे पीक न घेता कडधान्ये (चना, मूग, उडीद, तुरी) आणि तृणधान्ये यांची आलटून-पालटून लागवड करावी. कडधान्यांमुळे जमिनीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण होते.मोकळे पाणी देण्याऐवजी ठिबक (Drip) किंवा तुषार (Sprinkler) सिंचनाचा वापर करावा, ज्यामुळे जमीन क्षारपड किंवा चोपण होण्यापासून वाचते.

12.

मातीची सुपीकता टिकवण्यासाठी शेणखताचा वापर करतो व हिरवळीच्या पिकांचा वापर करतो व जीवामृत चा वापर करतो व सेंद्रिय खतांचा वापर करतो तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी वापरतो व जमिनीवरती आच्छादन करतो व पिकांमध्ये फेरबदल करतो तसेच जिवाणू कल्चर वापरतो

13.

बरु, डेंचा पेरून फुलात आलं कि गाडतो, trichoderma चा वापर करता, ऊस चा पाला कुटी करतो तसेच पाणी ड्रीप नेच देतो, कधी कचरा गाडतो जमिनीत 

14.

ताग आणि  डेंच्या सारखी हिरवळीची पिके घेऊन व गांडूळ खताचा वापर करून मातीचा सेंद्रिय कर्ब वाढविणे व जीवामृत , दशपर्णी अर्क यांच्या वापराने उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे 

15.

मी देशी गाईच्या शेणा पासून तयार केलेला गांडूळ खत वापरतो देशी गाईच्या शेणापासून तयार केलेले जीवामृत वापरतो व शेतामध्ये काडी कचऱ्याच्या आच्छादन करतो यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते व मातीचे आरोग्य पण टिकून राहते.

16.

जिवाणू कल्चर, गांडूळ खत 

17.

*बाजरीचे पीक निघाल्यानंतर त्याची वैरण वाळवून ठेवून त्या वैराणी चा उपयोग कांद्याची वखार लावण्यासाठी केला जातो कांदा विकल्यानंतर खराब झालेली वैराग शेतामध्ये पसरून त्यामध्ये रोटर मारला जातो व त्याचे लहान लहान तुकडे करून त्यानंतर नांगरटीत मध्ये काढून टाकले जाते 

*ऊस तोडणीच्या काळामध्ये उसाचे पाचट - यंत्राच्या साह्याने गठ्ठे बांधून उन्हाळ्यात मोकळ्या शेतात पसरून नांगरटी मध्ये गाडले जाते.

*जनावरांचे मलमूत्र एका टाकीमध्ये पंपाच्या सहाय्याने शेतीला दर पंधरा दिवसाला पिकाला पाणी देतेवेळी पाण्यामधून सोडले जाते 

*उसाचे पीक ठिबक सिंचनाच्या साह्याने घेतले जाते 

*रसायनिक खताचा कमीत कमी वापर करून जमिनीची सुबत्ता वाढवली जाते 

18.

आज रासायनिक खतांचा अतिवापर यामुळे जमीन नापीक बनली.आहे.भविषयात शेती टीकवायची असेल तर पहिल्यांदा जमीनीची सुपीकता वाढवणे गरजेचे आहे.यासाठी हिरवळीची खते उदा.ताग.ढेंचा.चवळी.उडीद.घेणे गरजेचे आहे.तसेच शेणखत.कोंबडी खत गांडूळ खत.उनहळयामधये रानात बकरी बसवणे.गरजेचे आहे.जयावेळी आपण सर्व प्रकारची पिके घेतली जातात त्यावेळी जीवामृत.गोकृपा अर्क.अमृतपाणी.जर तुम्ही याचा वापर केला तर नक्कीच तुमची जमीन सुपीक बनायला वेळ लागणार नाही.जीवाणुचा वापर उदा.पी एस बी.के.एम बी व रायजोबियम.करावा.

19.

मातीची सुपीकता टिकवून उत्पादकता वाढवण्यासाठी मी खालील उपाययोजना करतो :

*मातीचे नियमित माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा संतुलित वापर करतो.

*रासायनिक खतांचा अतिरेक टाळून शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत यांचा वापर वाढवतो.

*पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी ते जमिनीत मिसळून सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न करतो.

*जैविक निविष्ठा व उपयुक्त जिवाणू यांचा वापर करून जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या व कार्यक्षमता वाढवतो.

*पीक फेरपालट, आंतरपीक व मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करतो.

*जमिनीची धूप होऊ नये म्हणून बांधबंदिस्ती, बांधावर फळबाग लागवड आणि आच्छादन व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करतो.

*पिकाला आवश्यक तेवढेच पाणी देऊन ठिबक सिंचनाचा वापर करतो.

*जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे, गांडुळांची संख्या वाढवणे आणि माती जिवंत ठेवणे यावर विशेष भर देतो.

*“मी जिवाणू NPK कॉन्सोर्शियाचा वापर केल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवून रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढण्यास आणि पिकांची वाढ सुधारण्यास मदत होते.”

माझ्या मते, माती ही फक्त पीक घेण्याचे माध्यम नसून ती जिवंत संपत्ती आहे. आज मातीची सुपीकता जपली तरच उद्याची शेती आणि पुढच्या पिढीचे अन्न सुरक्षित राहील. 

20.

Gadulakata wapara

21.

सेंद्रिय पदार्थ + संतुलित खत व्यवस्थापन + पीक फेरपालट + माती परीक्षण + जल-मृदा संवर्धन यामुळे मातीची सुपीकता टिकून राहते आणि दीर्घकालीन उत्पादकता वाढते.


22.नंदकुमार लहू पाटील, मु जामघर पो नेहरोली ता वाडा जि पालघर 

गांडूळखत व कंपोस्ट खत वापरतो.


23. राजकुमार चंद्रकांत नाले, मु.पो.बरड, ता-फलटण, जि-सातारा 

पहिले तर मी खोल मशागत खूप कमी करतो, 5 वर्षातून एकदा नांगरणी करतो. 50% शेणखत वेस्ट डिकंपोजर महिन्यातून एकदा जीवामृत देऊन जमिनीत सूक्ष्मजीवांची आणि गांडुळांची संख्या वाढवणे, ज्यामुळे जमीन भुसभुशीत राहते.


24. साईराम राठोड, कोमल नगर पडेगाव छत्रपती संभाजीनगर

 माती परीक्षण + सेंद्रिय कर्ब वाढ + संतुलित खत व्यवस्थापन + पीक फेरपालट + जलसंधारण यांचा एकत्रित वापर केल्यास मातीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून उत्पादनक्षमता वाढवता येते.

उपाय करता येतात:

*माती परीक्षण – मातीतील NPK, सेंद्रिय कर्ब, pH आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करून त्यानुसार खत व्यवस्थापन करावे.

*सेंद्रिय खतांचा वापर – शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत आणि हिरवळीची खते वापरावीत.

*पीक फेरपालट – एकाच पिकाची वारंवार लागवड न करता कडधान्ये, तृणधान्ये व इतर पिकांचा फेरपालट करावा.

*जैवखतांचा वापर – रायझोबियम, PSB, अझोटोबॅक्टर इत्यादी योग्य जैवखते वापरावीत.

*पिकांचे अवशेष जमिनीत मिसळणे – काडीकचरा जाळण्याऐवजी त्याचे कंपोस्ट करून किंवा कुजवून जमिनीत मिसळावे.

*रासायनिक खतांचा संतुलित वापर – गरजेपेक्षा जास्त युरिया किंवा इतर रासायनिक खते वापरू नयेत.

*सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता – झिंक, बोरॉन, लोह इत्यादींची कमतरता असल्यास माती परीक्षणानुसार पूर्तता करावी.

*जलसंधारण – बांधबंदिस्ती, सेंद्रिय आच्छादन (Mulching) आणि ठिबक सिंचनाचा वापर करून मातीची धूप व पाण्याचा अपव्यय कमी करावा.

*मातीची धूप रोखणे – उताराच्या जमिनीवर समतल चर, बांध आणि आच्छादन पिकांचा वापर करावा.

*सेंद्रिय कर्ब वाढवणे – पीक अवशेष, कंपोस्ट आणि हिरवळीच्या खतांमुळे जमिनीची रचना, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि सूक्ष्मजीवांची क्रिया सुधारते.


25.विशाल फकीरचंद धनवंत, चंडोल बुलढाणा

*शेणखताचा जास्त वापर, *हिरवाळीच्या खताचा वापर 


26. विजय हिमंतराव भुतेकर, मु पो सवणा ता. चिखली जि. बुलढाणा 

ट्रायकोडर्मा, मायक्रोराझा, जिवाम्रुत, एन पि के, हे डॉ किशन चंद्रा सराचे प्रोडक्ट व महाबिज चे महाजैविक, तसेच बायोमिक्स, एस 9 कल्चर सतत स्पिकंलर ने जमिनीला देतो व तसेच गव्हाचे काड व काडी कचरा शेतात नागरट करुन दाबतो.


27. गणपत मिसाळ, जानेफळ दाभाडी 

*दरवर्षी माती परीक्षण करतो. *शेणखत, गांडूळ खत वापरून सेंद्रिय कर्ब वाढवतो, पिकाचे अवशेष जाळत नाही. *NPK Consortia (Azotobacter + PSB + KMB)* जिवाणू खत वापरतो - त्यामुळे खत खर्च 25% कमी झाला. *धेंचा हिरवळीचे खत आणि पीक फेरपालट करतो. *ट्रायकोडर्मा वापरतो व आच्छादन (Mulching) करतो. यामुळे जमीन भुसभुशीत झाली, उत्पादन वाढले.


28.वैभव घुगे, वाडीरामराव 

शेणखत टाकणे 


29.प्रमोद उमेकर, रा. वनर्षी, पो. एच.व्ही.पी.एम. अमरावती

कंपोस्ट खताचा वापर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नारळामधील सर्वांत धोकादायक कीड । सोंड्या भुंगा । नुकसान आणि नियंत्रण उपाय । Red Palm Weevil

आंबा फळगळ समस्या । कारणे आणि उपाय । Mango Fruit Dropping Problem & Solutions

आंबा मोहोर संरक्षण व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit