नारळामधील किडी । Pest of Coconut | एकात्मिक व्यवस्थापन |
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTlg1_JxHysm1vb-D-2Tcb6h5u1NNQNn9upWBpyN-ZXWvt36MILUu5mB8RqOlhs86M0tP4tYKSFCWZ7cTqxgo3QLH6mHJVlL2OGWPbZBhxdfxDqG_JSD9NOP2uvqG72Dqd1hWNs_5aEf10irUMBBPXKynXveFnwIa0uGEJm6I_1d6y7iT7ti6k6ejW/s320/Coconut%20trees.jpg)
🏫IPM SCHOOL🌱 महाराष्ट्रात नारळाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होत असून किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट दिसून येत आहे. कारण किडींच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला नारळ पिकामध्ये खूप नुकसान झालेले पाहायला मिळते. या लेखामधून आपण या किडींचे नियंत्रण कसे करावे हे बघूया. गेंड्या भुंगा:- नारळावरील गेंड्या भुंग्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीने बागेतील मेलेल्या माडांची खोडे, कुजलेला पालापाचोळा इत्यादी जाळून नष्ट करावा किंवा त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. भुंग्याचा उपद्रव जास्त असताना म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये झाडाला उपद्रव झाला असताना किंवा त्यातून ताजा भुसा बाहेर येताना दिसत असल्यास त्यामध्ये तारेचा हूक घालावा व भुंगे बाहेर काढावेत. नारळाच्या बागेत २ × २ × २ फूट आकाराचे एकूण १o खडे प्रती हेक्टरी खोदावेत. त्यामध्ये शेणखत भरून ठेवावे. अशा खड्ड्यांमधून सापडणा-या अळ्या दर दोन महिन्याने एकत्र करून माराव्यात किंवा खड्ड्यांवर कार्बारील ०.१ टक्केची फवारणी करावी. कीड नियंत्रणासाठी त्यामध्ये एन्टोमोपॅथोजेन म्हणजेच बुरशी (मेटारिझियम अॅनिसोप्लिया) खताच्या खड्...