पोस्ट्स

जुलै २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

इमेज
  जुलै २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे... 1. विशाल पाटील, सेनापती कापशी ता.कागल जि.कोल्हापूर जैविक कीटकनाशक वापरतो , चिकट सापाळा  2. संजय रामचंद्र कांबळे, नंद्याळ ता. कागल जि. कोल्हापूर  चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे, दशपर्णी अर्क तसेच निम अर्क फवारणी घेणे. 3. शिवाजी पांडुरंग चौगले, मु. पो. सोन्याची शिरोली, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर  एकात्मिक कीड नियंत्रण  करू जैविक कीड नियंत्रण करू  प्रकाश सापळे फेरोमेन ट्रॅप याचा वापर करू  निमार्क डदशपर्णी अर्क वापरू. 4. सयाजीराव गोपाळराव पोखरकर, कोतूळ,(गोपाळ बाग) ता. अकोले, जि. अहिल्यानगर   रशक किड्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी आम्ही कोबी वर्गीय पिकामध्ये चिकटसापळे,वेलवर्गीय पिकांमध्ये फेरोमेन ट्रॅप्स, प्रकाश सापळे, यांचा वापर करतो. तर वांगी पिकामध्ये कडुनिंबाचा पाला तसेच करंज झाडाचा पाला वाटून, वस्त्रगाळ करून, त्याचे द्रावण पिकांवर फवारतो त्यामुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो/होत न...

जून २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

इमेज
  जून २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे 1. समीर सुर्वे, मु.पो - पावशी, ता-कुडाळ, सिंधुदुर्ग Right time sowing seeds, pond water irrigation, 2. कृषिभूषण सयाजीराव गोपाळराव पोखरकर, कोतूळ,ता. अकोले,जि. अहिल्यानगर  दुबार पेरणीची समस्या टाळण्यासाठी अवलंब करण्याच्या पद्धती..... *जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. *साधारणपणे 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. *उताराच्या आडव्या दिशेने पेरणी करावी, जेणेकरून झालेल्या पावसाचे पाणी अडवून नैसर्गिक रित्या त्या ओलाव्यावर पिकाची उत्तम वाढ होऊ शकेल. *संरक्षित पाण्याची व्यवस्था करून ठेवावी. * पावसाच्या कालखंडात अचानक पावसाने हुलकावणी दिल्यास एक दोन ओलिता वाचून पीक हातचे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संरक्षित पाणी देण्यासाठी शेततळे किंवा इतर ठिकाणची पर्यायी व्यवस्था तयार करावी. *कमी पावसात तग धरू शकतील अशा पिकांची पेरणीसाठी निवड करावी. *साधारणपणे या प्रमुख बाबींचा अवलंब केल्यास दुबार पेरणीचे संकट टाळता येऊ शकते. 3. गणपत रावसाहेब मिसाळ,...

मे २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

इमेज
  मे २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे  1. निबोंळी पावडर 2. निबोंळी पावडर 3. Metarisum and beveria bassiana 2 kg each per acre  Or bayer Lasenta 150 gm / acre 200 litre water 4. प्रकाश सापळे लावत आहे  5. * Epn * Pacilomycine * Lecnta + decis * Slayer pro 6. लिंबाच्या झाडाखाली प्रकाश सापळे लाउन 7.  शरद केशवराव बोंडे (भिलोना तालुका अचलपूर  जिल्हा अमरावती) खरीप पिकांना (विशेषतः सोयाबीन, कपाशी) हुमणी (White Grub) अळीपासून वाचवण्यासाठी सध्या खालील प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत:१. जैविक नियंत्रण (सर्वात प्रभावी):मेटारायझियम ॲनिसोप्ली (Metarhizium anisopliae): हे जैविक कीटकनाशक प्रति एकर २ ते ३ किलो शेणखतात किंवा ओल्या मातीत मिसळून जमिनीत द्यावे.ब्युव्हेरिया बॅसियाना (Beauveria bassiana): याचा वापरही हुमणीच्या अळ्या नष्ट करण्यासाठी केला जातो.निंबोळी पेंड: पेरणीपूर्वी हेक्टरी ५०० किलो निंबोळी पेंड जमिनीत टाकल्यास हुमणीच्या अंड्यांचा नायनाट होतो.२. यांत्रिक नियंत्रण:प्रकाश सापळे (Light Traps): जून-जु...

आंबा फळगळ समस्या । कारणे आणि उपाय । Mango Fruit Dropping Problem & Solutions

इमेज
आंबा पिकातील फळगळ ही बागायतदारांसमोरील एक मोठी समस्या आहे. मोहोर लागल्यापासून ते फळ काढणीपर्यंत विविध टप्प्यांवर फळगळ होऊ शकते. वेळीच उपाययोजना केल्यास हे नुकसान टाळता येते. आंबा फळगळीची प्रमुख कारणे पाण्याचा ताण: - कडक उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे किंवा अनियमित पाणी पुरवठ्यामुळे झाड फळे गाळून टाकते. अन्नद्रव्यांची कमतरता:- प्रामुख्याने बोरॉन, झिंक आणि नत्र यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फळांची देठं कमकुवत होतात. हवामानातील बदल:- अचानक वाढलेले तापमान, उष्ण वारे (लू) किंवा ढगाळ हवामान यामुळे फळगळ वाढते. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव(तुडतुडे):- हे फळांतील रस शोषतात, ज्यामुळे फळे गळतात. भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव:- या रोगांमुळे फळांच्या देठावर जखमा होतात. संप्रेरकांचे असंतुलन: झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे 'अ‍ॅबसिसिक ॲसिड' तयार होते, जे फळगळीला कारणीभूत ठरते. परागीभवन : परागीभवन योग्य प्रकारे न झाल्यास फळांची वाढ खुंटते आणि ती गळून पडतात. फळगळ थांबवण्यासाठी उपाययोजना १.पाणी व्यवस्थापन: -  *फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर झ...

आंबा फळ सेटिंग अवस्था । तुडतुडे नियंत्रण उपाय । Jassid Management in Mango

इमेज
  आंबा बागेत फळे सेट होत असताना (म्हणजेच फळे वाटाण्याएवढी किंवा सुपारीच्या आकाराची असताना) तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास फळगळ होण्याची मोठी शक्यता असते. या काळात तुडतुडे फळांच्या कोवळ्या देठातून रस शोषतात, ज्यामुळे फळे कमकुवत होऊन गळतात. अशा वेळी योग्य प्रकारे नियंत्रण उपाय केल्यास होणारे नुकसान टाळले जाऊ शकते.  आंबा बागेमध्ये तुडतुडे नियंत्रणासाठी उपाययोजना:- सुरुवातीला जैविक आणि नैसर्गिक उपाय वापर करा. ज्यामुळे किडीचा प्रादुर्भाव लक्षात येईल आणि किडीचा प्रादुर्भाव कमी असताना नियंत्रण उपाय करणे सोपे जाईल.  *मशागत आणि बागेमध्ये स्वच्छता (प्रतिबंधात्मक उपाय)- छाटणी : बागेत सूर्यप्रकाश खेळता राहील याची काळजी घ्या. झाडाच्या आतील दाटी करणाऱ्या आणि वाळलेल्या फांद्या काढून टाका. सूर्यप्रकाशामुळे तुडतुड्यांचे प्रमाण कमी होते. *चिकट सापळे वापर: बागेत प्रति एकरी ३० ते ४० पिवळे चिकट सापळे लावा. तुडतुडे पिवळ्या रंगाकडे आकर्षित होऊन या सापळ्यांना चिकटतात. *जैविक उपाय:- * बिव्हेरिया बासियानाचा वापर: हे एक मित्र बुरशी आहे. ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी केल्यास तुडतुड्...

ऊसाची उन्हाळ्यातील उशिरा लागण । घ्यावयाची काळजी । Precautions for Late planting of Sugarcane

इमेज
  फेब्रुवारी-मार्च महिन्यात केली जाणारी उसाची लागण ही 'सुरू' हंगामातील लागण मानली जाते. या काळात तापमान वाढू लागलेले असते, त्यामुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो. या उशिराच्या लागणीत जास्तीत जास्त फुटवा आणि जोमदार वाढ मिळवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.  घ्यावयाची काळजी:- १. योग्य वाणाची निवड:- * उशिरा लागण करताना लवकर पक्व होणारे आणि उष्णतेला दाद देणारे वाण निवडावेत. * शिफारस केलेले वाण: को. ८६०३२ (नीरा), को.व्ही.एस.आय. ०३१०२, को.एम. ०२६५ (फुले २६५). *ऊस बेणेची निवड करताना ताज्या आणि रसरशीत बेण्याचा (१०-११ महिने वयाचा ऊस) वापर करावा. २. बेणे प्रक्रिया (Seed Treatment):-  * ऊसाची लागण करताना बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.  * उन्हाळ्यामुळे उसाचे डोळे मरण्याची शक्यता असते, म्हणून बेणे प्रक्रिया चुकवू नका.  * बुरशीनाशक: १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेंन्डाझिम मिसळून बेणे १० मिनिटे बुडवून ठेवावे. हे सुरुवातीच्या अवस्थेत रोगापासून संरक्षण करते.  * कीटकनाशक: खोडकिडीच्या प्रतिबंधासाठी याच द्रावणात क्लोरोपायरीफॉस किंवा इमिडाक्लोप्रीड मिसळावे. * जिवाणू संव...

बिन्सची शेती । पिकाचे नुकसान करणाऱ्या किडी । Bean Farming

इमेज
   बिन्स हे लवकर येणाऱ्या पिकांपैकी असून बाजारामध्ये चांगली मागणी सुद्धा आहे. बीन्स पिकामध्ये प्रामुख्याने फ्रेंच बीन्स, श्रावण घेवडा, वाल यांचा समावेश होतो. या पिकांची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.   पिकामध्ये येणारी कीड आणि रोगांमुळे पिकाचे मोठे नुकसान होऊन उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. बिन्स (फ्रेंच बीन्स) पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३०% ते ८०% पर्यंत घट होऊ शकते. तर आज आपण बीन्स पिकामध्ये कोणत्या किडीमुळे नुकसान होऊ शकते याबद्दल माहिती घेऊया.  बिन्स मधील नुकसान कारक किडी:- १. खोड माशी (Bean Fly):- ही कीड सुरुवातीच्या अवस्थेत (रोपावस्थेत) सर्वाधिक नुकसान करते. नुकसान:- माशी कोवळ्या पानांवर अंडी घालते. त्यातून बाहेर पडणारी अळी पानाच्या शिरेतून प्रवास करत थेट खोडात शिरते. परिणाम: अळी खोडाचा आतील भाग (गाभा) खाते, ज्यामुळे अन्नपुरवठा खंडित होतो. रोप पिवळे पडते, सुकते आणि शेवटी मरते. रोप उपटून पाहिले असता खोड मधून फाटलेले दिसते. २. रसशोषक किडी:- यामध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे (Thrips) आणि पांढरी माशी यांचा समावेश होतो. नुक...

ऊसाचे पाचट । शेतामध्येच कुजवल्यास मिळणारे फायदे । Sugarcane Farming

इमेज
  ऊसाचे पाचट जाळणे ही जरी वेळ वाचवणारी पद्धत वाटत असली, तरी ती शेतीसाठी 'स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी' आहे. पाचट जाळल्यामुळे होणारे नुकसान केवळ जमिनीपुरते मर्यादित नसून त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. पण हेच पाचट आपण जाळण्या ऐवजी शेतामध्ये कुजवल्यास भरपूर असे फायदे मिळू शकतात.  पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे:- १.जमिनीतील मित्रजीवांचा नाश: - जमिनीचा सुपीकपणा टिकवून ठेवणारे उपयुक्त जीवाणू आणि बुरशी आगीच्या उष्णतेमुळे नष्ट होतात. *जमिनीला जिवंत ठेवणारे गांडूळ उष्णतेमुळे मरतात किंवा जमिनीच्या खूप खोलवर जातात, ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. २.अन्नद्रव्यांचा ऱ्हास:- पाचट जाळल्यामुळे त्यातील नत्र (Nitrogen) पूर्णपणे हवेत उडून जातो. * इतर घटक: स्फुरद आणि पालाश यांसारखी अन्नद्रव्ये राखेच्या स्वरूपात उरतात खरी, पण ती वाऱ्याने उडून जातात किंवा पाण्यासोबत वाहून जातात. एक टन पाचट जाळल्यामुळे जमिनीचे सुमारे ५ ते ६ किलो नत्र, १ ते २ किलो स्फुरद आणि ८ ते १० किलो पालाश यांचे नुकसान होते. ३.सेंद्रिय कर्बाचे नुकसान:- सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा कणा आहे. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्...

ऊसामधील पोंगेमर/सुरळीमर (लवकर येणारा खोडकिडा) । नुकसान आणि सोपे नियंत्रण उपाय । Sugarcane Early Shoot Borer

इमेज
  महाराष्ट्रात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऊसाची लागण झाल्यानंतर पीक निघेपर्यंत बऱ्याच किडींमुळे पिकाचे नुकसान होऊ शकते. तसे ऊसामध्ये जवळपास ४ वेगवेगळ्या प्रकारच्या खोडकिडींचा प्रादुर्भाव होतो. तसेच इतर अनेक किडी सुद्धा नुकसान करतात.   सुरुवातीच्या अवस्थेत लवकर येणाऱ्या खोडकिडीमुळे बऱ्याच भागात मोठे नुकसान होऊ शकते.ऊस पिकामध्ये सुरळीमर (लवकर येणारा खोडकिडा) ही कीड प्रामुख्याने लागवडीपासून ते ३-४ महिन्यांपर्यंतच्या पिकावर जास्त प्रमाणात दिसून येते. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचा मुख्य पोंगा (शेंडा) वाळतो, ज्याला आपण सुरळीमर/पोंगेमर म्हणतो.  लवकर येणारा खोडकिडा(Early Shoot Borer)(शास्त्रीय नाव - Chilo infuscatellus) किडीचे नुकसान करण्याची पद्धत:- १.अळीचा शिरकाव (Boring):-  या किडीची मादी पतंग उसाच्या कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी सुरुवातीला पाने खाते आणि त्यानंतर जमिनीलगत उसाच्या खोडाला छिद्र पाडून आत शिरते. २.मुख्य पोंग्यावर हल्ला:-  अळी खोडाच्या आत शिरल्यानंतर, ती उसाचा वाढणारा मुख्य भाग किंवा गाभा खाऊन...

उन्हाळी सोयाबीन । जास्त उत्पादनासाठी महत्वाच्या गोष्टी । Summer Soyabean

इमेज
  बरेच शेतकरी खरीप हंगामासोबत उन्हाळी हंगामामध्येही सोयाबेन पीक घेत आहेत. उन्हाळी सोयाबीनसाठी योग्य वेळेत पेरणी करण्यासोबतच, उन्हाळी हंगामात खोल नांगरणी, बीजप्रक्रिया, योग्य वाणाची निवड, पाणी व्यवस्थापन (आंतरमशागत आणि ठिबक सिंचन), तण नियंत्रण (तणनाशक फवारणी), खत व्यवस्थापन (NPK), आणि कीड व रोग व्यवस्थापन या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून चांगली वाढ होऊन उत्पादन वाढेल.    उन्हाळी सोयाबीन हे प्रामुख्याने बियाणे उत्पादनासाठी घेतले जाते. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पीक हातचे जात असल्याने शेतकरी प्रामुख्याने चांगल्या उत्पन्नासाठी तसेच प्रामुख्याने बियाण्याच्या दृष्टीने पिकवत आहेत.  उन्हाळी सोयाबीनसाठी महत्त्वाच्या बाबी: १.पेरणीची योग्य वेळ:- वेळ:उन्हाळी हंगामी सोयाबीन डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्या पर्यंत पिकाची पेरणी करावी. जर पेरणीस उशीर झाला तर पिक फुलोऱ्यात असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फुले शेंगा गळ होते व दाण्याचा आकार लहान होतो. पेरणीच्या वेळी दिवसाचे तापमान १८ ते...

पिकातील तण नियंत्रण । एकात्मिक तण नियंत्रण पद्धती । Integrated Weed Management

इमेज
  उत्पादन वाढीसाठी पिकामध्ये खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण, रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याच्यासोबत तण नियंत्रण सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. पिकामध्ये येणारे तण नियंत्रण वेळीच केले नाही तर पुढे त्याचा मोठा परिणाम उत्पादनावरही होईल. तर आज तण नियंत्रण करण्यासाठी फक्त रासायनिक गोष्टींचा नाही तर एकात्मिक पद्धतीचा उपयोग महत्वाचा ठरेल.      एकात्मिक तण नियंत्रण म्हणजे केवळ तणनाशकांवर अवलंबून न राहता, वेगवेगळ्या पद्धतींचा एकत्रित वापर करून तणांचा प्रादुर्भाव पिकाच्या नुकसान पातळीच्या खाली ठेवणे. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि खर्चही कमी होतो. एकात्मिक तण नियंत्रणाच्या पद्धती:- १.प्रतिबंधात्मक पद्धती:- तण शेतात येऊच नये म्हणून घ्यायची काळजी:- *शुद्ध बियाणे वापर:- पेरणीसाठी वापरले जाणारे बियाणे तणमुक्त असावे. *चांगले कुजलेले शेणखताचा वापर:- कच्चे शेणखत वापरल्यास त्यातील तणांच्या बिया शेतात पसरतात, म्हणून नेहमी चांगले कुजलेले खत वापरावे. *यंत्रांची स्वच्छता: एका शेतातून दुसऱ्या शेतात नांगरणी किंवा मळणीसाठी यंत्रे नेण्यापूर्वी ती स्वच्छ करावीत. *पाण्याचे पाट स्वच्छ ठ...

वांगी पिकामध्ये कामगंध सापळे उपयोग । कीड व्यवस्थापनातील मदत । Pheromone Trap for Brinjal

इमेज
    भाजीपाला पिकामध्ये वांगी पीक हे मोठ्या प्रमाणात पिकवले जाते आणि याला बाजारामध्येही खूप मोठी मागणी सुद्धा असते. त्यामुळे बरेच शेतकरी वांगी पिकवतात. वांगी पिकाचा विषारी करता बऱ्याच किडी पिकाचे नुकसान करतात. त्यामध्ये प्रामुख्याने शेंडा आणि फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी, लाल कोळी,  हड्डा बीटल या किडींच्या मुळे नुकसान होते.   यापैकी शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या किडीमुळे सर्वात जास्त नुकसान होते. या किडीच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर अतिशय प्रभावी ठरू शकतो.  वांगी पिकामध्ये कामगंध सापळे (Pheromone Traps) हे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा एक अत्यंत प्रभावी आणि स्वस्त भाग आहेत. वांग्यावरील सर्वात मोठी समस्या म्हणजे 'शेंडा आणि फळ पोखरणारी अळी'. या अळीच्या नियंत्रणात हे सापळे महत्त्वाची भूमिका बजावतात. १.अळीचे जीवनचक्र रोखणे:- नर पतंगांना आकर्षित करणे: कामगंध सापळ्यामध्ये एक विशिष्ट रसायनाचा वापर केला जातो, ज्याचा वास मादी पतंगासारखा असतो. यामुळे नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडले जातात.  प्रजनन रोखणे:- या वासाला भुलून शेताती...