टोमॅटो | Pest Management | कामगंध सापळे | IPM
संपूर्ण राज्यामध्ये घेतले जाणारे आणि बाजारपेठेमध्ये संपूर्ण वर्षभर मागणी असणारे पीक म्हणजे टोमॅटो. टोमॅटो पिकाची लागवड सर्व हंगामामध्ये केली जाते. टोमॅटो पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कीड पिकाचे नुकसान करते. जे शेतकरी चालल्या प्रकारे आणि सुरुवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करतात तेच किडींना पिकाचे नुकसान करण्यापासून थांबवू शकतात. बरेच शेतकरी किडीच्या नियंत्रणासाठी फक्त रासायनिक पद्धतीवर अवलंबून असतात. त्यांचा कीड नियंत्रणासाठी खर्च वाढत राहतो आणि किडीचे नियंत्रण होत नाही.उलट सारखे रासायनिक औषध फवारणीमुळे बऱ्याच वेळा त्या किडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि रासायनिक औषधाला न जुमानता कीड पिकाचे नुकसान करत राहते.म्हणून तर एकात्मिक पद्धतींचा वापर करून कीड नियंत्रण केले पाहिजे. कामगंध सापळे यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. टोमॅटो पिकामध्ये कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरता येतील? नागअळी:- टोमॅटो पिकामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव रोप नर्सरींमधून आणले जाते त्यावेळेपासून आपल्याला दिसून येतो. रोपांची लागण केल्यानंतर उष्ण हवामानात क...