कडुनिंब | शेतीसाठी उपयोग | कीड नियंत्रणासाठी फायदे |
*🏫IPM SCHOOL🌱* *शेतीसाठी बहुउपयोगी कडुनिंब* निसर्गाने शेती साठी दिलेली देणं म्हणजे कडूलिंब. पर्यावरण शुद्धीकरणात कडुनिंबचे फार महत्वाचे कार्य करते. कडुनिंबाचे झाड सतत प्राणवायू वातावरणात सोडत असते. बहुउपयोगी असे हे झाड असल्यामुळे शेती क्षेत्राबरोबर वन विभागातर्फे सामाजिक वनीकरणासाठी ही सर्वोत्कृष्ट वनस्पती/झाड मानले जात आहे. कडुलिंबाचा शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. निंबोळी किंवा पानांचा रस असो की अर्क तसेच निंबोळी तेल हे सर्वोत्कृष्ट असे नैसर्गिक कीड,रोग व जिवाणु नियंत्रक आहे.निंबोळी अर्क व निंबोळी तेलाने अनेक प्रकारचे कीड व रोग नियंत्रित होतात. यामुळे एकंदरीत पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होऊन मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी हे एक वरदान आहे. याशिवाय निंबोळ्या व पाल्याचे खतदेखील अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. कडूनिंब वृक्षाच्या पानांमध्ये व बियांमध्ये खालीलप्रमाणे रासायनिक घटक आढळून येतात. फुले लागण्याचा कालावधी :- मार्च -एप्रिल. बी/ फळे लागण्याचा कालावधी :- मे-जुन प्रति झाड उत्पादन :- परिपक्व झाड (दह...