Trap crop | Maize | सापळा पीक | एकात्मिक कीड नियंत्रण
सर्वच शेतकरी हंगामानुसार वेगवेगळी पिके घेतात आणि सर्वच पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव होतो.बदलता निसर्ग आणि पिकावर होणार किडींचा प्रादुर्भाव आणि त्यासाठी होणारा खर्च यामुळे शेतकरी हैराण होत आहे.बऱ्याच वेळेला शेतकरी पिकामध्ये कीड दिसू लागल्यावर कीड नियंत्रणासाठी धडपड करतो पण जर एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती समजून घेतली तर कीड नियंत्रण तर सोपे होईलच पण त्यासोबतच होणारा खर्चही आटोक्यात येईल. किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासून मुख्य पिकाचे संरक्षण करण्यासाठी मशागत ,सापळा पीक,आंतरपिके,कामगंध सापळे,जैविक कीटकनाशके यासारख्या गोष्टींचा महत्वाचा भाग आहे. त्यामधील मक्याचे पीक कोणत्या किडीसाठी सापळा पीक म्हणून कार्य करते ते बघूया. * मक्का हे ज्वारीइतके महत्वाचे चारा पीक आहे. तसेच खरीप आणि रब्बी हंगामात मुख्य व आंतरपीक म्हणून संपुर्ण महाराष्ट्रभर घेतले जाते. या सोबतच मक्का हे उत्तम सापळा पीक म्हणून सुद्धा ओळखले जाते. * मक्का हा कुंपण(बॉर्डर क्रॉप),आंतरपीक पद्धतीने शत्रू किडींचे नियंत्रण करू शकतो. * मक्क्याकडे फुलकिडे (थ्रीप्स) चांगल्या प्रकारे आकर्ष...